

पुणे, ता. ६ : लाखो विद्यार्थी पुण्यात राहतात, त्यांचे शहरावर प्रेम आहे, त्यांनी पुणेकरांना कधीही त्रास दिला नाही. मात्र, आमदार रोहित पवार स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी पुणे शहर बंद पाडू असे म्हणत असतील, तर त्यांनी ते करून दाखवावे. पुणेकर काय आहेत, हे त्यांना दाखवून दिले जाईल,’’ असे आव्हान महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले.
रोहित पवार यांनी पुणे शहर बंद पाडण्याचे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर नागपुरे आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. नागपुरे म्हणाल्या, ‘‘गेल्या सहा दिवसांपासून पुणेकर आंदोलनाचा शांतपणे सामना करत आहेत. रस्ते बंद असल्याने विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांचे हाल झाले, तरीही नागरिकांनी तक्रार केली नाही. ज्या पुणेकरांनी या विद्यार्थ्यांना सांभाळले, त्यांना त्रास देऊन विद्यार्थ्यांचे हित जपले जाऊ शकत नाही. पुण्यात करिअरसाठी येणाऱ्या ७० टक्के विद्यार्थ्यांना शहराने नेहमीच मायेची उब दिली आहे. त्यामुळे पवारांचे वक्तव्य चुकीचे आहे.’’
सभागृहनेते गणेश बिडकर म्हणाले, ‘‘आमचा विरोध आंदोलनाला नसून आंदोलनाच्या नावाखाली पुणे बंद पाडण्याच्या डावाला आहे. मूळ विद्यार्थी अभ्यास करतात, ते शहर बंद करू शकत नाहीत. रोहित पवार हे पूर्णपणे राजकीय आंदोलन करत असून त्यांची घटनाबाह्य मागणी मुख्यमंत्री मान्य करू शकत नाहीत, हे जनतेला माहिती झाले आहे. रोहित पवारांनी पुणेकरांना गृहित धरू नये,’’ असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.