

माळेगाव, ता. १९ : पुणे महापौर मल्लखांब चषक स्पर्धेत अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शिवाजी संतोष वळकुंदे याने १४ वर्षांखालील गटात सुवर्ण, तर वेदांत गाढवे याने १२ वर्षांखालील गटात रौप्य पदक पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १८ संघांतील ५४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. शिवाजी याने ‘बेस्ट ऑफ सिक्स’मध्ये प्रथम क्रमांक मिळवत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते त्याला ट्रॉफी आणि एकूण २६ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक सोमनाथ कोठावळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, गार्गी दत्ता, प्रशांत तनपुरे, संतोष वाघ आणि प्राचार्य सूर्यकांत मुंढे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
03201
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.