'माझं पुणे शहर मला बरं करायचंय'; महापौरांचा हॉस्पिटलमधून भावनिक व्हिडिओ

टीम ई-सकाळ
मंगळवार, 7 जुलै 2020

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काहीजणांना कोरोना झाला आहे. त्यामुळे मोहोळ आणि त्यांच्या पत्नी मोनिका, आई यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पुणे  : पुणेकरांनो, 'मी बरा होतोय, पण आता आपल्या साऱ्यांना पुणे शहर बरे करण्याचा विश्वास मांडतानाच कोरोनाला हरविण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना मंगळवारी केले. माझा त्रास कमी झाला तरी, माझे शहर अजूनही बरे झालेले नाही ते ठणठणीत करण्याकरिता सामूहीकरित्या लढायचे आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले. कोरोना विरोधात लढणाऱ्या यंत्रणांना मोहोळ यांनी सलाम केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काहीजणांना कोरोना झाला आहे. त्यामुळे मोहोळ आणि त्यांच्या पत्नी मोनिका, आई यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या दरम्यान, गेल्या चार दिवसांमध्ये उपचार, शहरातील सध्यास्थिती आणि भविष्यातील लढाईचे स्वरूप याबाबत मोहोळ यांनी फेसबुक लाईव्हद्वारे  पुणेकरांशी संवाद साधला, कोरोना झाल्यापासून लोकांनी दाखविलेल्या प्रेमाचारत समाधान व्यक्त करीत, मोहोळ यांनी प्रत्येकाने काळजी योण्याचे आवाहन केले. त्याचवेळी गेल्या चार महिन्यांत कशा पदद्धतीने कामे झाली, त्याचा परिणाम, त्यातील प्रशासकीय यंत्रणांचे सहकार्य, पुणेकरांचे योगदान याचाही उल्लेख मोहोळ यांनी आपल्या दहा मिनिटांच्या संवादात केला.

आणखी वाचा - महापालिका अधिकाऱ्यांनी दिला कोरोनाल चकवा

मोहोळ म्हणाले, "कोरोनाच्या काळात पुणेकरांना सांभाळताना मी खूप काळजी घेतली; मात्र शेवटी ते घडले आणि मला कोरोना झाला. त्यात माझ्या कुटुंबियांना त्रास झाला. परंतु, आम्ही सगळीजण बरे आहोत. चार दिवसांच्या उपचारानंतर माझ्यात आता कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे मी बरा होतो आहे. मात्र, कोरोना पसरत आहे. ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. आपण पुणेकर काळजी घेत नाही, असे सांगण्यात येत आहे. ते आता खोडून काढायचे आहे." "गेल्या साडेतीन-चार महिन्यांत सगळीजण लढत आहोत. राजकीय मंडळीसह प्रशासनातील अधिकारीही जोमाने काम करीत आहेत आणि कोरोना वाढत आहे.त्यावर आता नियंत्रण मिळवायचे आहे," असे आवाहन मोहोळ यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune mayor murlidhar mohol facebook video from hospital