

BJP Shortlists Three Names For Pune Mayor Post
Esakal
पुणे, ता. २ : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत तीन नावे निश्चित करण्यात आली. मंगळवारी (ता. ३) सकाळी महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपकडून अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपने ११९ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपचाच महापौर होणार हे निश्चित झाले होते.