पुण्यात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांबाबत आता महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

२५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यास परवानगी देण्याचा विषय महापौर मोहोळ यांनी उपस्थित केला होता.

पुणे : पुणे शहरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना गावाकडे पाठवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले आहेत. त्याबाबत वेगाने कार्यावाही करावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात लाॅकडाऊन काळात हजारो विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना विद्यार्थी संघटना व सामाजिक संस्था यांच्याद्वारे भोजन पुरविले जात आहे. पण लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने हे विद्यार्थी आमची आरोग्य तपासणी करा  आणि गावाकडे जाण्याची व्यवस्था करा अशी मागणी करत आहेत. कोटाचे विद्यार्थी महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय झाल्यापासून या मागणीने जोर पकडला आहे. 

- Big Breaking : पुण्यात 71 हजार कुटुंबांचे होणार स्थलांतर; कोरोनाला रोखण्यासाठी नवी 'आयडिया'

२५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यास परवानगी देण्याचा विषय महापौर मोहोळ यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पाठविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांशी चर्चा करावी. त्यांची पुण्यात व संबंधित जिल्ह्यात ही तपासणी करावी असा सूचना पवार यांनी दिल्या होत्या. 

- इतिहासात पहिल्यांदाच शाळा-कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन होणार नाही साजरा!

महापौर मोहोळ म्हणाले, "पुण्यातील विद्यार्थी गावाकडे गेले तर बराच ताण कमी होईल, शिवाय ते विद्यार्थी ही आनंदी राहतील. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांची त्वरीत अंमलबजावणी करावी यासाठी जिल्हाधिकार्यांना पत्र दिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Mayors demand to the Collector for proceeding to send students home