esakal | Big Breaking : पुण्यात 71 हजार कुटुंबांचे होणार स्थलांतर; कोरोनाला रोखण्यासाठी नवी 'आयडिया'
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus more than 70 thousand people will shift Pune city

खबरदारीचा उपाय म्हणून या दाट लोकवस्तीच्या भागावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे.

Big Breaking : पुण्यात 71 हजार कुटुंबांचे होणार स्थलांतर; कोरोनाला रोखण्यासाठी नवी 'आयडिया'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Coronavirus : शहरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आणि संशयित असलेल्या पाच क्षेत्रिय कार्यालयांमधील सुमारे 71 हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची तयारी महापालिकेने पोलिसांच्या मदतीने सोमवारी दुपारी सुरू केली. महापालिकेच्या शाळा, खासगी मंगल कार्यालये, वसतीगृहांमध्ये या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आणखी वाचा - आता कायमचं घरी बसा, आयटी कर्मचाऱ्यांना येतायत मेसेज

भवानी पेठ, ढोले पाटील, कसबा पेठ, घोले रोड आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱया भागातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. शहरातील रुग्णसंख्येत या भागातील रहिवाशांचे सुमारे 75 टक्के प्रमाण आहे. तसेच एकूण मृत्युमुखी पडलेल्यांमध्येही याच भागातील रहिवाशांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या दाट लोकवस्तीच्या भागावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पालिकेने घेतला आढावा
महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सुनील फुलारी, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, पंकज देशमुख आदींनी या पाचही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील भागांना भेट दिली आणि आढावा घेतला. महापालिकेचे अनेक अधिकारीही या वेळी उपस्थित होते. दाट लोकवस्तीमध्ये अनेकांची घरे सुमारे शंभर चौरस फुटांची आहेत. त्या कुटुंबात 4 ते 5 जण असतात. त्यामुळे सोशल डिन्स्टिसिंगच्या नियमांचे पालन होत नाही. परिणामी कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायम आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठ्या जागांमध्ये राहण्याची तात्पुरता व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळा, खासगी मंगल कार्यालये आणि वसतीगृहे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून तेथे जेवण, न्याहारी पुरविणे शक्य आहे. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. काही रहिवाशांना एसआरएच्या इमारतींमध्येही हलविता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा - तंबाखूमुळं खरचं कोरोना पळून जातो?

पहिल्या टप्प्यात 20 हजार जणांचे स्थलांतर
महापालिकेने 71 हजार कुटुंबे स्थलांतर करण्याची तयारी सुरू केली असली तरी पहिल्या टप्प्यात सुमारे 20 हजार कुटुंबे स्थलांतरीत होतील, असा महापालिकेचा अंदाज आहे. तेथे स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. महापालिका सुरवातीला या कुटुंबांना आवाहन करणार आहे. एक आड एक, घरातील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात येईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

थोडक्यात महत्त्वाचे

  • क्षेत्रीय कार्यालये - भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, कसबा पेठ, घोले रोड आणि येरवडा
  • हॉट स्पॉटमधून स्थलांतर कराव्या लागणाऱ्या कुटुंबांची संख्या - सुमारे 71 हजार
  • स्थलांतर करावी लागणारी लोकसंख्या : सुमारे 3 लाख 50 हजार
  • शहरातील एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण या भागातील
  • कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्येही या भागातील रहिवाशांचे प्रमाण 70 टक्क्यांहून जास्त  
     
loading image
go to top