

Ajit Pawar Reviews Merged Villages' Issues
Sakal
पुणे : ‘महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठा, पथदिवे, कचरा या स्वरूपाचे प्रश्न तातडीने सोडवा. गावांच्या विकासकामांसाठी निधी नसल्याने कामांवर परिणाम होतो. त्यामुळे समाविष्ट गावांतील मिळकतकरावर राज्याचा नगर विकास विभाग काम करत आहे, येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडून मिळकतकराबाबतचा निर्णय महापालिकेला कळविला जाईल,’’ असे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले.