esakal | Pune : मेट्रोच्या प्रवाशांसाठी खूषखबर; मेट्रोचे डबे इटलीवरून पुण्याच्या सीमेवर
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रोच्या प्रवाशांसाठी खूषखबर; मेट्रोचे डबे इटलीवरून पुण्याच्या सीमेवर

मेट्रोच्या प्रवाशांसाठी खूषखबर; मेट्रोचे डबे इटलीवरून पुण्याच्या सीमेवर

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पासाठीचे कोच इटलीवरून बुधवारी मुंबईत पोचले. गुरुवारी ते पुण्यात पोचणार असून, त्यांची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अल्पावधीत ट्रायल होणार आहे. नवरात्राच्या मुहूर्तावर महामेट्रोने दोन्ही शहरातील प्रवाशांना खूषखबर दिली आहे.

हेही वाचा: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'

पुणे मेट्रोसाठी ३४ मेट्रो ट्रेनची ऑर्डर टिटागढ फिरेमा (Titagarh Firema) या कंपनीला देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रेन मध्ये ३ कोच असणार आहेत. त्यामुळे टिटागढ फिरेमा हि कंपनी १०२ कोच पुणे मेट्रोसाठी बनवुन पुरवठा करणार आहेत. मेट्रोशी झालेल्या करारानुसार पहिल्या काही ट्रेन ह्या टिटागढ फिरेमाच्या इटली येथील कारखान्यामध्ये तयार होणार आहेत. व उर्वरित ट्रेन कोलकत्ता येथे तयार होणार आहेत. आज दि. ०६.१०.२०२१ रोजी इटलीत तयार झालेली पहिली ट्रेन (३ कोच असलेली) मुंबई बंदरात दाखल झाली आहे. समुद्रमार्गे आलेली ट्रेन जहाजावरुन उतरवून ट्रक वर लादण्यात आल्या आहेत. कस्टम आणि इतर बाबींची पुर्तता केल्यानंतर ट्रेन लवकरच पुण्यात दाखल होणार आहेत.

हेही वाचा: NCBला रेव्ह पार्टीची माहिती देण्यासाठी गेलो होतो: भानुशाली

पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येणाऱ्या टिटागढ फिरेमा कंपनीच्या कोच या ऑल्युमिनियम धातूपासूनबनविण्यात आल्या आहेत. त्या वजनाने हलक्या असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होणार आहे.तसेच त्यांना कमी देखभालीची गरज पडणार आहे. एका कोचची लांबी २९ मी. असणार आहे. तसेच कोचची उंची ११.३० मी. असणार आहे. कोचची अधिकतर रुंदी २.९ मी. असणार आहे.एका कोचची प्रवासी आसनक्षमता ३२० असणार आहे. आणि संपूर्ण ३ कोच ट्रेन ची प्रवाशी क्षमता९७० पेसेंजर असणार आहे. प्रत्येक कोचमध्ये ४४ लोकांना बसण्याची व्यवस्था असेल.

कोचचा अधिकतम वेग ९० किमी. प्रति तास असणार आहे. ३ कोचच्या ट्रेन मध्ये एक डब्बा महिलांसाठी राखीव असणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग जणांसाठी २ व्हीलचेअर साठी राखीव जागा असणार आहे. या ट्रेनमध्ये जागतिक दर्जाच्या सर्वोत्तम प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. एअर कंडिशनिंग, सीसीटीव्ही, प्रवांशाच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण, आपातकालीन द्वार, प्रवासी उद्घोषणा प्रणाली, दरवाजे उघडताना व बंद होताना दृश्य आणि श्राव्य संकेत प्रणाली असणार आहेत. उर्वरित २ ट्रेनचे बनविण्याचे काम इटलीतील टिटागढ फिरेमा कारखान्यात चालू असून लवकरच ते देखील भारतात पाठविण्यात येणार आहेत. याप्रांसगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी म्हटले आहे की , “पुणे मेट्रोसाठी बनविण्यात आलेल्या ट्रेन या जागतिक दर्जाच्या, अत्याधुनिक, वजनाने हलके व ऊर्जेची बचत करणाऱ्या असणार आहेत.”

loading image
go to top