

Big Boost to Pune Metro Network; Land Acquisition Process Initiated
sakal
पुणे : शिवाजीनगरमधील एसटी स्थानकाच्या जागेवर खासगी-सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) संकुल उभारणार असून, त्याबाबत एसटी महामंडळाशी करार होणार आहे. त्यानंतर कामाला प्रारंभ होईल. त्यात मेट्रोबरोबरच एसटी बसस्थानकही असेल, तसेच पीएमपीच्या थांब्यांसाठीही जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गांसाठी वेगाने प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.