
पुणे : पुणे महापालिकेसह पुणे महानगर प्रदेशच्या परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्याने ३१२ किलोमीटर लांबीची मेट्रो आणि त्यात ८० किलोमीटर नवीन बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टीम (बीआरटीएस) मार्ग, ४६ किलोमीटर बस मार्ग, बारा टर्मिनलचा पुनर्विकास, १९ नवीन उड्डाण पूल असे सुमारे १ लाख ३३ हजार ५३५ कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यापूर्वी ‘पीएमआरडीए’ने एल अँड टी कंपनीच्या मदतीने ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’