

Pune Metro Pink Line vs Bus and Cab Fare - AI Image
esakal
Pune: मागील अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेला पुणे मेट्रोच्या पिंक लाइनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि हिंजवडी आयटी पार्कच्या परिसरात काम करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. पुण्यातून हिंजवडीकडे जाणाऱ्या मार्गावरील ट्रॅफिकच्या समस्येला वैतागलेल्या पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी मिळाली आणि या मार्गावरील रोजच्या प्रवासासाठी मेट्रो, पीएमपीएमएल बस आणि कॅबसाठी नेमका किती खर्च येऊ शकतो याची तुलना सुरू झाली.