

Pune Metro Line 3 Connectivity: Easy Travel to Pune Railway Station, Airport and Hinjawadi
esakal
Pune Metro Line 3 Connectivity: पुणे मेट्रोची तिसरी मार्गिका म्हणजेच पिंक लाइन 4 नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी सुरू झाली. पहिल्याच दिवशी या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. या मार्गामुळे हिंजवडी आयटी पार्क आणि पुणे शहर यांच्यातील प्रवास सोपा होणार आहे. विशेष म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांनाही या मेट्रोचा फायदा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी सध्या मेट्रो बदलण्याची किंवा बसने पुढे जाण्याची सोय वापरावी लागणार आहे.