Pune Metro sakal
पुणे
Pune Metro : मंडई स्थानकाचा नवीन प्रवेशद्वार सोमवारपासून खुला; तुळशीबाग परिसरात गर्दीचा सुटका!
Mandai Station : पुणे मेट्रो मंडई स्थानकाचा नवीन प्रवेशद्वार सोमवारपासून (ता. ९) खुले होणार आहे. तसेच रामवाडी आणि कासारवाडी स्थानकांवर सरकत्या जिन्यांची सुविधा सुरु होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे : मेट्रो प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी मंडई स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक तीन सोमवारपासून (ता. ९) खुले करणार आहे. त्यामुळे तुळशीबाग, दगडूशेठ गणपती मंदिर, शनिपार, बाबूगेनू गणपती अशा महत्त्वाच्या व गजबजलेल्या धार्मिक तसेच पर्यटन स्थळी पोचणे सोपे होईल. त्यामुळे हजारो नागरिकांची सोय होईल.