

FDA officials inspecting food stalls at Khau Galli on MG Road in Pune, with five eateries ordered to stop business for operating without valid FSSAI licences or registration
esakal
पुण्यातील कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रसिद्ध खाऊ गल्लीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष तपासणी मोहीम राबवून पाच खाद्यविक्रेत्यांवर कारवाई केली आहे. अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे आढळल्यानंतर संबंधित पाच आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १६ नोव्हेंबर रोजी ही तपासणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण १५ खाद्यविक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली होती.