पुणे : "म्हाडा' परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली; 'मास्टरमाईंड'सह तिघांना बेड्या

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेची आरोग्य विभागानंतर आणखी एक महत्वाची कामगिरी
"म्हाडा' परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली; 'मास्टरमाईंड'सह तिघांना बेड्या
"म्हाडा' परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली; 'मास्टरमाईंड'सह तिघांना बेड्याSakal

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरणातुन दिवसेंदिवस महत्वाची माहिती पुढे येत असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परिक्षेचीही प्रश्‍नपत्रिका फुटल्याचे प्रकरण शनिवारी रात्री उघडकीस आले. त्याची कुणकुण लागताच पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी "म्हाडा'च्या परीक्षा प्रक्रिया पुर्ण करण्याची जबाबदारी सोपविलेल्या पिंपरी-चिंचवड येथील जी.ए. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या संचालकालाच प्रश्‍नपत्रिका फोडणाऱ्यांचा "मास्टरमाईंड' असल्याचे उघड झाल्यानंतर सायबर पोलिसांनी संचालकासह तिघांना रातोरात बेड्या ठोकल्या.

जी.ए. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख (वय 32 रा.खराळवाडी, पिंपरी-चिंचवड), अंकुश रामभाऊ हरकळ (वय 44, रा. किनगावराजा,सिंधखेडराजा, बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ ( वय 42, रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी "म्हाडा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

"म्हाडा' परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली; 'मास्टरमाईंड'सह तिघांना बेड्या
सातारा : यात्रेसाठी निर्बंध चालतील; पण बंदी नको - ग्रामस्थांची भुमिका

या प्रकरणाबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अतिरीक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले आदी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाचा सायबर पोलिसांच्या पथकाकडून तपास सुरू आहे. त्यामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपीसह 14 जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, रविवारी ( ता. 12) म्हाडाच्या गट अ,ब आणि क अशा पदांसाठीची परीक्षा होणार होती. मात्र याही परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फुटणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या प्रकरणात अटक केलेल्या काही आरोपींच्या चौकशीतुन पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातुन शनिवारी रात्रीपासूनच संशयति आरोपींना ताब्यात घेण्यास सुरूवात केली.

औरंगाबाद येथील "टार्गेट करिअर पॉईंट' या संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि "सक्षम ऍकेडमी' या संस्थेचा संचालक कृष्णा जाधव यांनी हा कट रचल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. मुळच्या बुलढाणा व औरंगाबाद येथील संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी म्हाडाची प्रश्नपत्रिका फोडून ती उमेदवारांना देण्याची तयारी सुरू केली होती. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोरे यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे म्हाडाच्या परिक्षेसाठी बसलेल्या तीन उमेदवारांची प्रवेशपत्र, मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, कोरे धनादेश, आरोग्य विभागाच्या परिक्षेतील उमेदवारांच्या नावाची यादी सापडली, असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

शनिवारी मध्यरात्री वरिष्ठ पोलिस निरीक्षक डि.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक मीनल पाटील व पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी तत्काळ तपासाल गती दिली. हरकळच्या ठावठिकाणा शोधला. त्यावेळी हरकळ व डॉ. देशमुख हे तिघेही एकाच कारमधून चालल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी देशमुखकडून लॅपटॉप, पेनड्राईव्ह जप्त केले आहे. न्यायालयाने संशयित आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

डॉ. प्रितीश देशमुख "मास्टरमाईंड'

म्हाडाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी डॉ.देशमुख संचालक असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीवर सोपविण्यात आली होती. त्यांच्यात झालेल्या करारानुसार, 14 संवर्गातील गट अ,ब,क या पदांची भरतीप्रक्रिया 12, 15,19, 20 डिसेंबर या कालावधीत होणार होती. संबंधित परीक्षेची प्रश्‍नपत्रिका गोपनीय ठेवण्याच्या नियमाचा भंग करून देशमुखने ती त्याच्या लॅपटॉप व पेनड्राईव्हमध्ये घेतली. तसेच त्याने अंकुश व संतोष मरकळ यांच्यसमवेत एकत्र येत, गुन्हेगारी कट रचून शासन, म्हाडा व उमेदवारांची फसवणूक केल्याचे उघड झाले.

"म्हाडा' परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली; 'मास्टरमाईंड'सह तिघांना बेड्या
जनरल बिपीन रावत आमच्यासाठी हीरो आहेत : लेफ्टनंट कृष्णकांत केतकर

"लष्कर भरती, आरोग्य विभाग भरतीपाठोपाठ म्हाडाच्या भरती प्रक्रियेतील प्रश्‍नपत्रिका फुटीचे प्रकरण पुणे पोलिसांनी उजेडात आणले. लष्कर, आरोग्यपाठोपाठच आता म्हाडा भरती प्रक्रियेतील फसवणुकीच्या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल. आत्तापर्यंत मुख्य आरोपीसह अन्य आरोपींनाही अटक केली आहे.''

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com