
पुणे : म्हाळसाकांत सिंचन योजनेचा 'कुकडी प्रकल्पात' होणार समावेश
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील दुष्काळीभाग म्हणून ओळख असलेल्या लोणी- धामणी परिसराला वरदान ठरणाऱ्या म्हाळसाकांत सिंचन योजना आता प्रत्यक्षात साकारणार असून या योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करणेबाबत सर्वेक्षणास मान्यता दिली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी.
तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी परिसरातील पहाडदरा, शिरदाळे, धामणी, लोणी, वडगावपीर,मांदळेवाडी, खडकवाडी, रानमळा या गावातील शेती हि पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे. गेली काही वर्षापासून पावसाचे प्रमाण घटत गेल्याने या परिसरात तीन चार वर्षापासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. शेतात फक्त खरीप हंगामातील पिक घेता येते इतर वेळी शेत कोरडी पडलेली असता. शेतात काम नसल्याने या भागातील महिला दररोज वाहनातून दूर अंतरावरील बागायती क्षेत्रातील शेतात कामासाठी जात आहे.
या परिसरातील शेतीसाठी शाश्वत सिंचन योजना व्हावी अशी नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व या भागाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील हे सातत्याने पाठपुरावा करत होते या योजणेसंदर्भात मंत्रालय येथे ३० नोव्हेंबर २०२१ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली होते.
यावेळी बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) बसवंत स्वामी, कार्यकारी संचालक विलास रजपूत, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, डिंभे धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सं. ज. माने, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सं.गा. सांगळे, विवेक वळसे पाटील व या परिसरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
लोणी धामणी परिसरातील टंचाईग्रस्त गावांसाठी प्रस्तावित उपसा सिंचन योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करून यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सुचना केली होती मंत्री जयंत पाटील यांनी नियोजित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे त्यावेळी निर्देश दिले होते तेव्हा पासूनच खर्या अर्थाने म्हाळसाकांत योजनेला गती मिळाली होती. त्यानुसार २८ एप्रिल ला जलसंपदा विभागाने प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करणेबाबत सर्वेक्षणास तत्वता मान्यता दिली असल्याने परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
Web Title: Pune Mhalsakant Irrigation Scheme Included Kukdi Project Approval Dilip Walse Patil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..