
पुण्यातील सदाशिव पेठेत काल रात्री झालेल्या एका हिंसक घटनेने खळबळ उडाली आहे. Z ब्रिज परिसरात रात्री 8 च्या सुमारास टोळक्याने कोयत्याने हल्ला करून गाड्यांची तोडफोड केली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा CCTV फुटेज समोर आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाची मदत मिळाली आहे.