

कात्रज - पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. २८) अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संघाने ३८७ कोटी रुपयांची उलाढाल केली असून, संघाला एक कोटी पाच लाख ५७ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सभेच्या प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी अहवाल वर्षातील संघाच्या कामकाजाचा आणि प्रगतीचा आढावा घेतला.