

Police investigation underway in Pune after a shocking case of repeated abuse of a minor girl by close relatives comes to light.
esakal
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठित, सुरक्षित आणि उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवर तिच्याच तीन जवळच्या नातेवाईकांनी गेल्या सहा-सात महिन्यांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना तात्काळ अटक केली असून, शहरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.