आक्षेपार्ह छायाचित्रे ‘व्हायरल’ करणाऱ्यास सक्तमजुरी

आक्षेपार्ह छायाचित्रे ‘व्हायरल’ 
करणाऱ्यास सक्तमजुरी
Published on

पुणे, ता. ५ ः अल्पवयीन मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करून तिचा लैंगिक छळ करणाऱ्या तरुणाला पुण्याच्या विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने दोषी ठरवून सहा महिने सक्तमजुरी आणि दोनशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
प्रभाकर ऊर्फ लकी जमिनीकांत परिंडा (वय २४, रा. मोहम्मदवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मुख्य आरोपी विभूप्रसाद परिंडाविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विभूप्रसाद परिंडा याने एका अल्पवयीन मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे काढली; तर सहआरोपी प्रभाकर परिंडाने आपल्या समाजमाध्यम खात्यावरून ही छायाचित्रे प्रसारित केली. बावधन पोलिस ठाण्याचे निरीक्षक भास्कर कदम यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीवर न्यायालयात पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःचा गुन्हा कबूल केला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केला. न्यायालयाने पुरावे आणि आरोपीची कबुली विचारात घेऊन त्याला माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com