
सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी जिवंत अवस्थेत आढळला.
पोलिस चौकशीत समोर आलं की, त्याने कर्जामुळे बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता.
स्थानिक नागरिकांनी त्याला दरीत पाहिल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत.
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरुन गायब झालेला गौतम गायकवाड नावाचा तरुण अखेर पाच दिवसांनंतर सापडला आहे. सिंहगडावरील तानाजी कड्यावरून तो गायब झाला होता अशी माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर त्या तरुणाचा शोध घेतला आहे. रविवारी सायंकाळी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत गौतमने सिंहगडावरुन बेपत्ता होण्याचा बनाव केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळाले आहे.