

A dramatic confrontation unfolded at MIT ADT University campus in Pune when a father confronted a DY Patil student accused of harassing his daughter online
esakal
Viral Video: पुण्यातील नामांकित MIT ADT विद्यापीठाच्या आवारात एक हायव्होल्टेज घटना घडली आहे. गेल्या १५ दिवसांपासून एका विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून ऑनलाइन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला विद्यार्थिनीच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि त्याला जाब विचारला. यामुळे दोघांमध्ये तीव्र झटापट झाली असून, संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला.