Pune Crime: रुग्णालयाचा पत्ता विचारला अन् विद्यार्थ्याचा २४ हजारांचा मोबाईल हिसकावला! एमआयटी प्रवेशद्वाराजवळ तिघांचा धुमाकूळ

Pune Mobile Snatching Case Near MIT College Entrance Gate: 'हॉस्पिटल कुठे आहे?' विचारत विद्यार्थ्याला गाठले; २४ हजारांचा मोबाईल हिसकावून तिघे पसार!
Lonikand Pune Crime News Thieves Snatch Redmi Mobile Worth 24000 from Engineering Student Near MIT College Entrance

Lonikand Pune Crime News Thieves Snatch Redmi Mobile Worth 24000 from Engineering Student Near MIT College Entrance

esakal

Updated on: 

लोणी काळभोर : रुग्णालयाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एमआयटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एका विद्यार्थ्याच्या हातातील २४ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून तिघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले. मंगळवारी (ता. ३) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...