MLA Sunil Tingare : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; विधानसभेत मागणी

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. हे कुत्रे लहान मुले, महिला, वृद्धांसह दुचाकीस्वारावर हल्ले करत असल्याने दहशतीचे वातावरण आहे.
MLA Sunil Tingare
MLA Sunil Tingaresakal
Summary

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. हे कुत्रे लहान मुले, महिला, वृद्धांसह दुचाकीस्वारावर हल्ले करत असल्याने दहशतीचे वातावरण आहे.

पुणे - पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. हे कुत्रे लहान मुले, महिला, वृद्धांसह दुचाकीस्वारावर हल्ले करत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करा अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत केली. यावेळी कडक नियमावली करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल असे आश्‍वासन सरकरातर्फे देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी खराडीतील ब्रह्मा स्काय सिटी सोसायटीमध्ये मानीत गाडेकर हा खेळताना त्याच्यावर भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. अशा अनेक घटना खराडी, चंदन नगर, वडगावशेरीसह संपूर्ण शहरात घडत आहेत.

पुणे शहरात सुमारे साडेतीन लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. एक वर्षात महापालिका हद्दीत १६ हजार ५६९ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. पण फक्त १७ हजार १७८ कुत्र्यांची नसबंदी आहे. नसबंदीचे प्रमाण अत्यल्प आहे.

MLA Sunil Tingare
Sangram Thopate : उपचाराअभावी मृत्यू झालेल्या प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; मदतीचे दिले आश्वासन

सोसायटी मधील नागरिक श्‍वानप्रेमी आहेत, रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला दिले जाते. पण हे कुत्री त्रासदायक ठरत आहेत का याचा विचार केला जात नाही. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. महापालिकेने सोसायटीधारकांसाठी कडक नियमावली तयार करावी. अशी मागणी सभागृहात केली, यावर समिती तयार करून निर्णय होईल असे आश्वासनही देण्यात आले, असे आमदार टिंगरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com