पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप-शिवसेनेत चुरस, काँग्रेसचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर; 'पदवीधर'चे काय?

Pune MLC Results पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजप-शिवसेनेत चुरस दिसून येतेय. तर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाच्या हर्षदा देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
Pune MLC Results

Pune MLC Results

Esakal

Updated on: 

राज्यात शिक्षक-पदवीधर विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. २२व्या फेरीअखेर भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर असून अपक्ष उमेदवार सचिन सानप (शिवसेना पुरस्कृत) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर काँग्रेसचे जयंत आसगावकर हे चौथ्या क्रमांकावर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com