

pune mmit college water poisoning incident
esakal
Student Poisoning News : पुणे (लोहगाव) येथील मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमएमआयटी) या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या १२ विद्यार्थिनींना दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्व विद्यार्थिनींवर सध्या लोहगावमधील साईश्रद्धा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर आरोप केले आहेत.