
Pre-Election Shockwave: MNS Claims Over 2,000 Duplicate Names Exposed in Pune's Crucial Bawdhan-Kothrud Voter List, Demands Immediate Action.
Sakal
पुणे : ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. पक्षाच्यावतीने पुण्यातील बावधन-कोथरूड प्रभागातील मतदार याद्यांची पडताळणी केली, त्यामध्ये अंदाजे दोन हजार मतदारांची नावे ही दुबार आहेत,’’ असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस बाळा शेडगे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर ‘‘बावधन-कोथरूड या प्रभागामध्ये एक हजार १५८ मतदारांची नावे हे दोन ते तीन वेळा आहेत, याचे पुरावे आहेत,’’ असेही शेडगे यांनी सांगितले.