
Pune : मोकाच्या गुन्ह्यातील आरोपीला पळून जाण्यास मदत,दोघांना अटक
पुणे : मोका कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी संतोष पवार याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. पुणे ग्रामीणच्या हद्दीत खानापूर येथे तपासासाठी आणल्यानंतर आरोपीने पलायन केले होते.
प्रणव उर्फ चिक्या अर्जुन रणधीर (वय १९), तन्मय उर्फ पिल्लुड्या तानाजी धिवार (वय १९, दोघे रा. खानापूर, ता. हवेली) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दाखल मोकाच्या गुन्ह्यातील आरोपी संतोष बाळू पवार (वय २२, रा. खानापुर) आणि साई राजेंद्र कुंभार (वय १९) यांना पोलिसांनी तपासासाठी खानापूर येथे आणले होते.
त्यावेळी संतोष पवार हा पोलिसांना धक्का मारून पळून गेला होता. चिक्या आणि पिल्लुड्या यांनी संतोषला दुचाकीवर बसवून पळून नेण्यास मदत केली होती. हे दोघे दापोडी येथील उद्यानालगत पानटपरीजवळ आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले