Pune News : नालेसफाई, आपत्ती व्यवस्थापनाचा अहवाल तीन दिवसांत द्या; मंजूषा नागपुरे यांचे प्रशासनाला आदेश

Pune monsoon flood prevention report before April deadline : पुण्यात संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी महापौर मंजूषा नागपूर यांनी प्रशासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. नालेसफाई ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ‘मुळा-मुठा’ प्रकल्पाचा आढावा, हॉटस्पॉट्स अद्ययावत करणे आणि रस्ते पूर्वस्थितीत आणण्याचे निर्देश देण्यात आले.
Pune monsoon flood prevention report before April deadline

Pune monsoon flood prevention report before April deadline

sakal

Updated on

पुणे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आणि शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी सद्यस्थितीचा अहवाल तीन दिवसात सादर करा असे आदेश महापौर मंजूषा नागपूर यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच पावसाळापूर्वी आपत्ती व्यवस्थापन, ‘मुळा-मुठा’ नदी सुधार प्रकल्पाचा तातडीने आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.पुणे शहरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाईसाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च होतात. पण ३० ते ४० टक्के कमी दराने ठेकेदार निविदा भरून कामे मिळवतात पण योग्य पद्धतीने काम करत नाहीत. त्यामुळे नालेसफाईच्या कामांवर प्रश्न उपस्थित होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com