
पुणे : पुणे महापालिकेने नदीपात्र, नाल्यांमधील काढलेली अतिक्रमणे, पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित केलेली कामे, यामुळे शहरात मुसळधार पाऊस होऊनही कोणत्याही रस्त्यावर पाणी तुंबलेले नाही, असे आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले. पाटबंधारे विभाग आणि महापालिकेमध्ये समन्वय आ . पावसाची शक्यता लक्षात घेऊन खडकवासला धरणात कमी पाणीसाठा ठेवल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस होऊनही मुठा नदीला मोठा पूर आलेला नाही, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनाच्या संदर्भात महापालिकेत आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.