

Monsoon Vulnerability: Rain-Soaked Waste Threatens Pune's Fragile Disposal Schedule
पुणे : महापालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत, कचरा रॅम्पवर कचरा साठून आहे. कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या होण्यास उशीर लागत असल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत आहे. ही स्थिती सामान्य दिवसातील आहे. पण आता पावसाळ्यात कचरा भिजण्याचे प्रमाण प्रचंड वाढणार आहे, त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचे वेळापत्रक बिघडणार असल्याने पावसाळ्यात कचऱ्याचे संकट गंभीर होताना दिसत आहे. मात्र, यावर अद्याप ठोस उपाययोजना प्रशासनाला करता आलेली नाही.