esakal | लसीकरणात दुसऱ्या डोसचेच जास्त लाभार्थी; पुण्यात शनिवारी तुटवडा कायम असणार

बोलून बातमी शोधा

Vaccine
लसीकरणात दुसऱ्या डोसचेच जास्त लाभार्थी; पुण्यात शनिवारी तुटवडा कायम असणार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेला कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या कमी होत असून, सध्या दुसरा डोस घेणाऱ्यांचेच प्रमाण जास्त आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. २३) राज्य शासनाकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने शनिवारी अनेक लसीकरण केंद्रावर तुटवडा जाणविण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज १६ हजार १४४ जणांनी लसीकरण झाले.

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण महत्त्वाचा उपाय आहे, पण मागणीच्या तुलनेत लस कमी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

महापालिकेला सोमवारी (ता. १९) ३५ हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यानंतर गुरूवारी (ता. २२) १० हजार डोस मिळाले. एवढ्या कमी प्रमाणात लस उपलब्धहोत असल्याने गेल्‍या काही दिवसांपासून लसीकरण २० हजारापेक्षा कमीच आहे. त्यामध्ये पहिल्या डोसपेक्षा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यच्या मोहिमेत अडचण येत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: Corona Update : पुणे शहरात आजही नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

२ लाक डोसची मागणी

पुणे शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढत असताना लस त्या प्रमाणा उपलब्ध होत नाहीत. हा तुटवडा कमी करण्यासाठी महापालिकेने २ लाख लसींची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.

शुक्रवारी झालेले लसीकर

लस घेणारे पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी २०० ४०४

फ्रंट लाईन कर्मचारी १२१८ ५५२

६० वर्षापुढील नागरिक १९५७ ५९४२

४५ ते६० वर्ष नागरिक ४३०५ १५३६

एकुण ७७१० ८४३४