Pune News : डिजिटल माध्यमांवरील जाहिरातींबाबत सर्वाधिक तक्रारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digital Media

डिजिटल माध्यमावर पाहिलेल्या जाहिरांतींबद्दल सर्वाधिक आक्षेप अथवा तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

Pune News : डिजिटल माध्यमांवरील जाहिरातींबाबत सर्वाधिक तक्रारी

पुणे - डिजिटल माध्यमावर पाहिलेल्या जाहिरांतींबद्दल सर्वाधिक आक्षेप अथवा तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ दरम्यान दोन हजार ७६४ जाहिरातींनी ॲ‍डव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एएससीआय) नियमांचे उल्लंघन केले होते. यातील जवळपास ५५ टक्‍के जाहिराती डिजिटल डोमेनवर पाहिल्या गेल्या, त्यानंतर ३९ टक्‍के मुद्रित माध्यमात आणि पाच टक्‍के टीव्ही माध्यमावर पाहिल्‍या गेल्‍या. २०२१-२२ च्या तुलनेत यंदा तक्रारींमध्ये १४ टक्के वाढ झाली आहे.

एएससीआयच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी व महासचिव मनिषा कपूर म्‍हणाल्‍या, ‘डिजिटल जाहिरातींची होणारी वाढ पाहता आम्ही जाहिरात-सर्व्‍हायलन्‍स तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ग्राहक, ब्रॅण्‍ड व सरकारी संस्थांच्या सहयोगाने अधिक कार्यक्षम जाहिरात विश्लेषण प्रणाली राबवत आहे. आम्ही आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एएससीआयने कोणत्या प्रकारच्या तक्रारी आणि परिणामांकडे लक्ष दिले आहे याबद्दल एक सर्वसमावेशक अहवाल जारी केला आहे.’ अहवालाचा एक भाग म्हणून एएससीआयने हाताळलेल्या प्रकरणांची, तसेच उल्लंघन करणारे प्रभावशाली व्यक्ती आणि ब्रॅण्‍ड्सची यादी देखील प्रकाशित केली आहे. एएससीआयकडून तीन हजार ३४० तक्रारींची शहानिशा करण्यात आली. प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींपैकी २८ टक्‍के उल्लंघन प्रभावकर्त्यांकडून (इन्फ्ल्यूएन्सर) होते.

‘तारा’चा वापर -

९८ टक्‍के ग्राहकांच्या तक्रारी आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स-आधारित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा ताराद्वारे प्राप्त झाल्या आहेत. ‘तारा’मुळे ग्राहकांना अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक तक्रार प्रणाली मिळाली आहे. नोंदवलेल्या एकूण तक्रारींपैकी जवळपास १६ टक्‍के तक्रारी ग्राहकांच्या होत्या, त्यानंतर १५ टक्‍के सरकारकडून, तर उद्योगांतर्गत तक्रारींचे प्रमाण ३ टक्‍के होत्या.

सर्वाधिक तक्रारी असलेली क्षेत्र (टक्क्यांमध्ये) -

१) नेहमीच्या शैक्षणिक जाहिराती - २२

२) वैयक्तीक प्रसाधने - १४

४) अन्न व पेय - १३

५) आरोग्यसेवा - १३

२) एज्युटेक जाहिराती - ५

६) गेमिंग - ४