MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी क्लासेस चालकांना नोटिसा; जिल्हाधिकारी कार्यालयामागे पर्यायी जागेचा पोलिसांकडून प्रस्ताव
No police permission for MPSC students' protest in Pune; Orders to vacate the area.

No police permission for MPSC students' protest in Pune; Orders to vacate the area.

Sakal

Updated on: 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पूल आणि पत्रकार भवनाजवळ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेचे कारण देत आंदोलनस्थळ तातडीने रिकामे करण्याचे कडक आदेश पोलिसांनी दिले आहेत. विनापरवानगी आंदोलन सुरू ठेवल्याप्रकरणी आणि त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याप्रकरणी २९ खासगी शिकवणी व अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com