esakal | Coronavirus : पुण्याच्या महापौरांचे पत्र व्हायरल; रोहित पवारांनी केला खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

pune mpsc students rohit pawar statement social media

अजित पवार यांनी प्रशासनाला तयारी करण्यास व संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्कात रहावे अशी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मोहोळ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देऊन याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली.

Coronavirus : पुण्याच्या महापौरांचे पत्र व्हायरल; रोहित पवारांनी केला खुलासा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांनी  राज्य सरकारने परवानगी दिल्या शिवाय पुण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'कोरोना' संदर्भात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी  पुण्यात अडकलेला विद्यार्थ्यांना गावाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली.

त्यावर अजित पवार यांनी प्रशासनाला तयारी करण्यास व संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्कात रहावे अशी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मोहोळ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी नवल  किशोर राम यांना निवेदन देऊन याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली होती. या मागणीच्या पत्राविषयी रोहित पवार यांनी खुलासा केला आहे.

अरे बापरे ! चक्क त्यांनी यासाठी टेरेस घेतलेत भाड्याने  

हे पत्र सोशल मिडीया वरून व्हायरल झाल्यानंतर पुण्यातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असा गैरसमज काही विद्यार्थ्यांचा झाला. यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून विद्यार्थ्यांचा गैरसमज दूर केला. "पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत महापालिकेतील एका नेत्याचं पत्र व्हाट्सअप्पवर व्हायरल होतंय.पण मला या विद्यार्थ्यांना सांगायचंय की ते पत्र म्हणजे परवानगी नाही तर विनंती आहे. त्यामुळे घरी जाण्यासाठी राज्य सरकारची अधिकृत परवानगी मिळेपर्यंत कोणीही आपापलं राहण्याचं ठिकाण सोडू नये." असे ट्विट मध्ये नमूद केले आहे.

महापौरांचा उल्लेख टाळला
रोहित पवार यांनी ट्विट करताना महापालिकेतील एका नेत्याचे पत्र वाॅट्सअॅवरून व्हायरल झाले आहे. ही परवानगी नसून, विनंती आहे असे नमूद केले, पण यात महापौर मोहोळ यांचा उल्लेख टाळला.

loading image
go to top