MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Daughter of Labourer Secures ACF Position : चंद्रपूर जिल्ह्यातील वडसी या छोट्या गावातील करिष्मा मेश्राम हिने भंगार गोळा करणाऱ्या कष्टकरी वडिलांच्या आणि शेतमजूर आईच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनसेवा परीक्षेत सहाय्यक वनसंरक्षक पदावर झेप घेतली असून, ती अनुसूचित जाती (SC) महिला उमेदवारांमध्ये राज्यात प्रथम ठरली आहे.
Daughter of Labourer Secures ACF Position

Daughter of Labourer Secures ACF Position

Sakal

Updated on

पुणे : आयुष्यात खडतर संघर्ष असेल तर स्वप्न पाहणे अन्‌ ते प्रत्यक्षात आणणे तितकेसे सोपे नसते. पण, चंद्रपूर जिल्ह्यातील वडसी या छोट्याशा गावातील करिष्माने हा समज मोडून काढलाय. भंगार गोळा करण्यासाठी तिच्या वडिलांनी केलेला मैलोन्‌मैल प्रवास...अन्‌ शेतात रात्रंदिवस कष्ट करताना आईने केलेले अपार कष्ट, याने शिक्षणाची पायाभरणी झालेल्या करिष्मा मेश्रामने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वनसेवा परीक्षेत ‘सहाय्यक वनसंरक्षक’ पदावर झेप घेतली आहे. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनुसूचित जाती (एससी) महिला उमेदवारांमध्ये ती प्रथम क्रमांकाने पात्र ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com