

Incomplete Sewer Links Aggravate Pune River Pollution
Sakal
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) आहेत, मात्र संबंधित प्रकल्पांना जोडणाऱ्या वाहिन्यांची (मिसिंग लिंक) कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मैलापाणी ओढ्यानाल्याच्या माध्यमातून मुळा-मुठा नदीमध्ये जात आहे. इतकेच नव्हे, सध्या एसटीपीच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त मैलापाणी व समाविष्ट गावांमधील शेकडो दशलक्ष लिटर (एमएलडी) मैलापाणी थेट मुळा-मुठा नदीत मिश्रित होत आहे. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे.