

Pune Mumbai Expressway traffic jam impact on ST buses
sakal
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा परिणाम तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. ५) देखील दिसून आला. गुरुवारी दुपारी १२ पर्यंत एसटी सेवेला ब्रेक लागला होता. त्यामुळे एसटी प्रशासनाने टप्याटप्याने वाहतूक सुरू ठेवली. पुणे विभागाच्या दिवसभरात शिवनेरीच्या ६६ फेऱ्या रद्द झाल्या. परिणामी एसटीच्या पुणे विभागाचे सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.