Pune Mumbai new Parallel Expressway
sakal
पुणे
Pune Mumbai Journey : पुणे-मुंबई प्रवास आता ९० मिनिटांत! नवीन द्रुतगती मार्गाच्या ‘डीपीआर’ला मंजुरी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणे-मुंबईदरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग बांधणार.
पुणे - पुण्याहून मुंबईला अवघ्या ९० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणे-मुंबईदरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग बांधणार आहे. त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) नुकतीच मंजुरी मिळाली असून, सहा महिन्यांत हा ‘डीपीआर’ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
