Pune : सिंहगड एक्सप्रेस आजपासून मुंबई - पुणेकरांच्या सेवेत दाखल

मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती
Sinhgad Express
Sinhgad Expresssakal media
Updated on

पुणे : मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आज पासून सुरू झाली आहे. आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटी ला हार घालून स्वागत केलं. आज पासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. पुण्यावरून ही रेल्वेगाडी (क्र. ०१००९) सकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी पोचेल.

ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी (क्र. ०१०१०) सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी निघेल आणि रात्री १० वाजता पुण्यात पोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे व मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईला ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The minister interacted with devotees during the Ashadhi Wari and reviewed facilities provided for Warkaris along the pilgrimage route.
Vaishnavi Welfare Foundation launched its first social service initiative by distributing food, drinking water and raincoats to Warkaris during the Ashadhi Wari.
The Free Eye Check-up Camp at Davadi has provided free cataract surgeries to more than 2,000 patients through a monthly healthcare initiative.
Sant Tukaram Maharaj Palkhi received a grand welcome at Uruli Kanchan as thousands of Warkaris continued their spiritual journey towards Pandharpur.
Marathi News Esakal
www.esakal.com