

Major Flaws in Stamp Duty Exemption
Sakal
पुणे : मुंढव्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारात मुद्रांक शुल्कमाफी घेताना इरादा पत्र (लेटर ऑफ इंटेट) जोडण्यात आले; परंतु जिल्हा उद्योग केंद्राचे पात्रता प्रमाणपत्र जोडलेले नाही. त्यामुळे सरकारचा महसूल बुडविल्याचा ठपका मुठे समितीने ठेवला आहे. त्याबरोबरच कंपनीच्या नावाने पॉवर ऑफ ॲटर्नी घेतली असताना दस्तनोंदणी करताना ती मात्र शीतल तेजवानी यांनी वैयक्तिक नावे केल्याचे, ‘बंद झालेले आणि मुंबई सरकार’ असा स्पष्ट उल्लेख असलेले सातबाराउतारा जोडणे, अभिनिर्णयासाठी सादर केलेल्या दस्तातील मजकूर आणि नोंदणी वेळी सादर केलेल्या खरेदीखातील मजकूर वेगवेगळा असल्याच्या अनेक त्रुटींवर या समितीने आपल्या अहवालात बोट ठेवले आहे.