

Heavy Vehicles Violate Entry Ban in Mundhwa
Sakal
मुंढवा : केशवनगर-मुंढव्यामध्ये अवजड वाहने अजूनही प्रवेशबंदीची वेळ झुगारून जा-ये करतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा तिढा कायम आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभागाने प्रवेशबंदीच्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या अवजड वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.