

Mundhwa Land Scam
sakal
पुणे : मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. गुन्ह्याचे स्वरूप आणि प्रकरणातील तथ्ये पाहता, अर्जदार आरोपी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्याबाबत अयशस्वी ठरला आहे. या टप्प्यावर आरोपी दिलासा मिळण्यास पात्र नाही, असे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा आदेश दिला.