esakal | स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Municipal

दहा हजार रुपये देणारे झाड...
सुभाष जगताप यांनी सत्ताधाऱ्यांनी ‘लाजलज्जा’ सोडली आहे, अशा शब्दांत प्रहार केला. त्या वाक्‍यावर माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी आक्षेप घेत ‘जगताप यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना भाषण करू देणार नाही,’ असा पवित्रा घेतला. सभागृह नेते धीरज घाटे यांनीदेखील या वादात उडी घेतली, त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते. अखेर महापौरांनी मध्यस्थी करीत खाली बसण्याचे सर्वांना आवाहन केले, तेव्हा हा वाद थांबला. पुन्हा भाषणांना सुरुवात झाली. जगताप यांनी, ‘‘भिमाले यांच्या प्रभागात १४ लाख रुपयांचे झाड आहे. ते झाड दररोज हलविले की दहा हजार रुपये देते, असे झाड प्रत्येक प्रभागात द्यावे,’’ असा चिमटा पुन्हा काढला. मात्र, त्या वेळी भिमाले सभागृहात उपस्थित नव्हते.

स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी  अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विकास करणारा आहे, अशा शब्दांत सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या सादर केलेल्या ७ हजार ३९० कोटींच्या अर्थसंकल्पावर सोमवारपासून सभागृहात चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सुभाष जगताप, आबा बागूल, सचिन दोडके, गणेश ढोरे, युवराज बेलदरे या नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील त्रुटी दाखवत सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला, तर सत्ताधारी नगरसेवक हरिदास चरवड, जयंत भावे, अजय खेडेकर, राणी भोसले, सुशील मेंगडे, आदित्य माळवे, स्वाती लोखंडे, राजश्री काळे, महेश वाबळे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.