Pune News: पुण्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम : महापालिका आयुक्त स्वत, रस्त्यावर उतरले, ९२ टन कचरा उचलला
Swachhata Hi Seva: पुणे महापालिकेने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाअंतर्गत एकत्र येऊन ९२ टन कचरा उचलत स्वच्छतेचा संदेश दिला. या अभियानात ३३०० हून अधिक अधिकारी, विद्यार्थी व संस्थांचा सहभाग होता.
पुणे : महापालिकेच्या विविध विभागांमधील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आयुक्त नवल किशोर राम यांनी रस्त्यावर उतरून शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचा संदेश दिला.