
PMC Commissioner Navalkishore Ram cracks down on corrupt officials in a Diwali clean-up drive
Sakal
पुणे : ऐन दिवाळीत पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनात फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधकाम झाल्याचे निदर्शनास आणन न दिल्याने बांधकाम विभागातील दोन अभियंत्यांना निलंबित केले आहे. तर अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने घोले रस्ता शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि दोन मुकादमांवर दंडात्मक कारवाई केली आहे.