PMC Budget 2021-22 : आयुक्त ११ टक्के करवाढीवर ठाम

 Pune Municipal Commissioner Vikram Kumar insists on 11 percent tax hike
Pune Municipal Commissioner Vikram Kumar insists on 11 percent tax hike

पुणे : पुणे शहरावरील वर्षभराच्या खर्चाचा आकडा फुगविताना उत्पन्नाचे नवे हाती नसलेल्या महापालिकेने पुणेकरांवर ११ टक्के करवाढ लादण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या सहा वर्षांत करात वाढ न झाल्याने ती सूचविण्यात आली असून, ती स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत मान्य करून अमलात आणू, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

नवी करवाढ लागू झाल्यास त्यातून सुमारे १३० कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळेल. त्याशिवाय नोंद नसलेल्या विशेषत: नव्या गावांमधील मिळकती, वापरात बदल झालेल्या मिळकतींचा शोध घेऊन कर वसूल करण्यावर महापालिका भर देणार आहे. त्यानुसार पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरातून २ हजार ६५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज महापालिकेला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

शहराचा विस्तार पाहता नव्या आणि जुन्या योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, त्यासाठी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने विकासकामांवर परिणाम होऊ लागला आहे. परंतु, उत्पन्न वाढीसाठी नवे प्रयोग करण्याऐवजी महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षात मिळकतरात ११ टक्के वाढ करण्याचे नियोजन २१-२२ च्या अंदाजपत्रकात केले आहे. त्यात सर्वसाधारण करात साडेपाच, साफसफाई करात साडेतीन आणि जलनिस्सारणात २ टक्के वाढ सूचविण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव येताच त्याला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही विरोधी सूर लावला आहे. तरीही ही वाढ करावी लागणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं

शहरात सध्या सुमारे सव्वादहा लाख मिळकती असून, नव्या २३ गावांमधील २ लाख मिळकतींसह एकूण मिळकतींचा आकडा ११ लाखांपर्यंत जाणार आहे. त्याशिवाय महापालिकेकडे नोंद न झालेल्या मिळकतींची संख्या अधिक आहे. तर निवासी मिळकतींची परवानगी असतानाही व्यावसायिक कारणांसाठी मिळकतींचा वापर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. या मिळकतींचा शोध घेऊन कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अंदाजपत्रकात स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com