esakal | Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं
sakal

बोलून बातमी शोधा

National War Memorial

‘पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक हे फक्त दक्षिण मुख्यालयाचे नाही तर, सामान्य नागरिकांचे देखिल आहे. लष्कराबरोबर सर्वसामान्य नागरिक, नागरी प्रशासन, राज्य सरकारच्या सहकार्यामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत या युद्ध स्मारकाचे नूतनीकरण करणे शक्य झाले आहे.

Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक हे फक्त दक्षिण मुख्यालयाचे नाही तर, सामान्य नागरिकांचे देखिल आहे. लष्कराबरोबर सर्वसामान्य नागरिक, नागरी प्रशासन, राज्य सरकारच्या सहकार्यामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत या युद्ध स्मारकाचे नूतनीकरण करणे शक्य झाले आहे. त्यामुळे, हे युद्ध स्मारक व संग्रहालय आता सामान्य लोकांसाठी पुन्हा खुले करण्यात येत आहे.’’ असे प्रतिपादन दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी मोहंती यांनी केले. 

दक्षिण मुख्यालय येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून हे युद्ध स्मारक आणि संग्रहालय आजपासून पुन्हा नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. यासाठी दक्षिण मुख्यालयाच्या वतीने शुक्रवारी एक विशेष स्मारक सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लेफ्टनंट जनरल मोहंती बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लेफ्टनंट जनरल मोहंती म्हणाले, ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे नागरिकांना लाइट अँड साऊंड शो’च्या माध्यमातून देशातील विविध युद्धांचा तसेच लष्कराच्या इतिहासाची माहिती दिली जाणार आहे. तर या युद्ध संग्रहालयामुळे नव्या पिढीची लष्करात जाण्याची इच्छाशक्ती बळावेल.’

डिम्ड कन्व्हेयनससाठी पावणे दोनशे सोसायट्यांचे प्रस्ताव

नागरिक आणि सैन्य यांच्यात संबंध स्थापित करण्यासाठी १५ ऑगस्ट १९९८ दरम्यान या युद्ध स्मारकाची स्थापना करण्यात आली होती. हे स्मारक आता पुण्याचे प्रतिष्ठीत स्थळ असून दररोज हजाराहून अधिक नागरिक या युद्ध स्मारक आणि तेथील संग्रहालयाला भेट देण्यासाठी येतात. कोरोनामुळे राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालय सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता हे स्मारक आणि संग्रहालय आठवड्यातील सहा दिवस (मंगळवार वगळता) साकाळी नऊ ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते आठ या वेळेत नागरिकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. तसेच लाइट अँड साउंड कार्यक्रम आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार ते रविवारी सायंकाळी पाऊने सात ते आठ या वेळेत खुले राहणार आहे.

मंचर येथून बँकेचे एकोणीस लाख रक्कम असलेले एटीएम चोरट्यांनी केले लंपास

लष्कराची शौर्य गाथा सांगणारे अष्ट स्तंभ
भारतीय लष्कराने स्वातंत्र्यानंतर लढलेल्या महत्त्वपूर्ण युद्धांची शौर्यगाथा सांगणारे आठ स्तंभ ‘पिलर्स ऑफ वेलर’ या युद्ध स्मारक येथे उभारण्यात आले आहे. स्मारकातील चार शिल्पांमध्ये (म्युरल्स) विविध युद्धातील पराक्रम आणि २१ परमवीरचक्र विजेत्यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. या संबंधी दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखांनी पुढाकार घेतला होता. तर या नूतनीकरणासाठी लागणाऱ्या निधीकरिता पुणे महानगरपालिका आणि ऍफनोल इंटरकनेक्ट इंडिया द्वारे मदत करण्यात आले.

Edited By - Prashant Patil