

PMC employees raise concerns after the administration issued transfer orders for 407 staff members without a counselling round.
Sakal
पुणे : पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये प्रशासनाने गनिमीकावा करत अचानक बदल्या केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. मतदार यादी पुनर्परीक्षण मोहीम (एसआयआर) संपल्यानंतर या बदल्या केल्या जाणार होत्या. पण कर्मचाऱ्यांना तक्रारींना वेळच मिळू नये यासाठी दोन दिवसांपूर्वी सुमारे ४०७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे.