esakal | Pune : मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवानिमित्त रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी मास्क न घालणाऱ्या व ‘सोशल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे.

महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक पथक नेमले आहे. त्यावर सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने गणेशोत्सवाच्या काळात शासनाने निर्बंध लावले आहेत. त्यामुळे मंडळांकडून गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे.

मात्र, पहिल्या दिवसांपासून रस्त्यांवर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक नागरिक मास्क व्यवस्थित लावत नाहीत किंवा ते काढून खिशात ठेवत आहेत. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेच्या पथकांकडून कारवाई करण्यात येत असून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

या अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून एका दिवसाला सुमारे ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाचा धोका टाळावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, मास्क न घालणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडूनही कारवाई केली जात आहे.

loading image
go to top